सोप्पं नसतं बरं का...
आपल्या पायावरं उभं राहणं..
हातातला घास बरोब्बर तोंडात जाणं..
बाबांनी आधार सोडल्यावरंही सायकल चालवतं राहणं।।
सोप्पं नसतं बरं का...
घराबाहेर पडणं..
दूरदेशी परक्या ठिकाणाला आपलसं करणं..
नवीन ऑफिसच्या लोकांमधे सामावून जाणं।।।
सोप्पं नसतं बरं का...
चिमणं मूल पहिल्यांदा हातात घेणं..
सश्याच्या काळजाने त्याची शाळेबाहेर वाट बघणं..
नव्या सुनेला आपल्या विश्वात सामावून घेणं।।।
सोप्पं नसतं बरं का...
आई-बाबांना थकलेलं पाहाणं..
हौसेला मुरड घालून तब्येतीची काळजी करणं..
रिटायरं झाल्यावरं 'आता काय?' याचं उत्तर सुचणं।।।
सोप्पं नसतं बरं का...
पण सोप्पं हवं कशाला...
आयुष्यं सुंदर आहे , ते फक्त 'जगायचं' असतं।।।।
5 comments:
छान लिहिले आहेस धनु,अशीच लिहीत रहा
खुूप सुंदर धनश्री..
Khup chan lihileys dhanu ..
Keep writing
Post a Comment