आज तुझा वाढदिवस. म्हणजे कागदोपत्री असलेली जन्मतारीख. तुझ्या शब्दात सांगायचं तर," आमच्या वेळी असले वाढदिवस वगैरे थेरं नसायची बरं ! माझा जन्म नवरात्रीतला.. मला बाई सगळ्यांचे वाढदिवस तिथीनेच लक्षात राहतात"!! असं म्हणून बाबा, आत्या, मी, बाकीची नातवंडे याना तिथीने वाढदिवस शुभेच्छा देणाऱ्या माझ्या आज्जीचा आज म्हणे वाढदिवस.
आज्जी .. हे नातंच जगात भारी आहे. त्यातून माझी आज्जी हि एकदम टिपिकल आज्जीच्या परिभाषेत बसणारी!! लहान मुलांमध्ये भलतीच पॉप्युलर! कारण ती पत्त्यांचे वेगवेगळे गेम्स खेळते आणि महत्वाचा म्हणजे ती मुलांना जिंकू देते (हि पत्ते परंपरा अगदी माझ्या मुलांनीही सांभाळली आहे. मिरजेला गेलं कि श्लोक लग्गेच पत्ते घेऊन पणजीच्या खोलीत जातो. आणि आता गाथा सुध्दा भिकार-सावकार मध्ये expert झाली आहे)!
मी लहान असताना दर शनिवारी शाळा सुटली कि भराभर एका पिशवीत कपडे कोंबायचे आणि दुधाच्या टेम्पोत बसून म्हैसाळला तुझ्याकडे यायचे. आणि एकदा तिकडे आले, कि मग आपली धमाल सुरु. दिवसभर पत्ते खेळणे आणि मग रात्री झोपताना गोष्टी ऐकणे हे मेन उद्देश. रविवारी दिवसभर तुझ्या मागे-पुढे करण्यात, 'आज्जी मी भांडी घासते, आज्जी मी पूजा करते' अशी लुडबुड करण्यातच सगळा वेळ जायचा. दुपारी तुझे कपाट उघडून त्यातली नवीन साबणे, पावडरीची डबे, सुषमाआत्यानी कॅनडा हुन आणलेले wet-wipes , चमचे- वाट्या, आणि अशा असंख्य छान छान गोष्टी घेऊन मी खेळायचे. आणि मग हळूच , " आज्जी, माझ्या कडे हा साबण नाहीये ग!! मी घेऊ का?" अशी बोळवण करून घ्यायचे. तेव्हा तू मला गालात हसू आवरत, सगळं भरून द्यायचीस. संध्याकाळी मिरजेला जाताना माझे डबडबलेले डोळे पुसून समजूत काढायचीस. तू बाहेर कुठेही निघालीस के मी चप्पल घालून तुझ्यामागून शेपूट म्हणून सगळीकडे सारखी जायचे.
जरा मोठी झाले आणि मग कन्या शाळेत, शाळेची चेयरमन म्हणून तू शाळेत आलीस कि सगळ्या मैत्रिणी- 'धनु sss ,तुझी आज्जी, तुझी आज्जी' असा सांगायला यायच्या. पण याचा तू कधी मला गर्व चढू दिला नाहीस. 'विजयाबाईंची नात' अशी विशेष वजनदार ओळख असली तरी 'धनश्री देवल' हि माझी स्वतःची ओळख शाळेत निर्माण करणे कसा गरजेचे आहे, हे ना सांगता जाणीव करून दिलीस.
८ बहिणींमध्ये थोरली, 'ताई' , तासगाव सारख्या छोट्या गावातून सांगलीला शिकायला आली. लग्नानंतर सुध्दा हिकमतीने BA आणि लहान मुलांना सांभाळत MA करणे काही सोपे काम नव्हते. तरीही तू जिद्दीने आणि आजोबांच्या सार्थ पाठिंब्याने पुढे शिकत राहिलीस. भाषेवरचे प्रभृत्व आणि खणखणीत आवाजाबरोबरच विचारांची श्रीमन्ती लाभलेली.. 'चूल आणि मूल' हेच स्त्री चे विश्व समजण्याऱ्या त्या काळात भलतीच सुधारमतवादी होतीस तू! मुलींना कार चालवायला यायला हवीच आणि ती दुरुस्त पण करता यायला हवी हे तुझे ठाम मत! सिंगापुर, कॅनडा, अमेरिकाफिरून आलेली..पण साडी सोडून गाऊन सुध्दा घालायला नकार! शाळेची चेयरमन, महिलामंडळाची अध्यक्ष, ब्रिज खेळणारी, मंडळात भाषणे करणारी, शाळेत संस्कृत शिकवणारी, तिन्ही मुलींना संपूर्ण स्वातंत्र्य देणारी ओपन माईंडेड आजी घरात असताना, माझं फेमिनिस्ट आणि फ्री-स्पिरिटेड होणं साहजिकच होतं. त्याच हट्टाने मी पुण्याला शिकायला गेले तोपर्यंत वयासोबत तुझी काळजी करायची सवय पण वाढत गेली.

उतार वयातही स्वावलंबी आणि आयुष्याचा पूर्ण आनंद घेण्याची समाधानी वृत्ती कशी जपावी मला जाणवून दिलीस. श्लोक-तुझं पहिलं पंतवंड. त्याचे भरपूर लाड केलेस तू. त्याच्याशी पत्ते, कॅरम, सापशिडी, बुद्धिबळ, सोंगट्या हे सगळं मनापासून खेळलीस. एकदा तर त्याच्या हट्टाखातर फुटबॉल सुध्दा!! सकाळी उठल्यावर रेडिओवर छान भजने किंवा स्तोत्र लावून ती गुणगुणत चहा करताना मस्त आवाज यायचा तुझ्या खोलीतून. आणि मग प्रसन्न मूड असताना आपण खूप गप्पा मारायचो. तुला तुझ्या लाडक्या शंकराला नेऊन आणायचं, किंवा पत्त्याला कोल्हटकर काकूंकडे घेऊन जायच हि कामे केली कि मला तेवढीच सेवा केल्याच श्रावणबाळासारख धन्य वाटायचं. आणि संध्याकाळी तुझं लाडक CID सुरु झालं टीव्ही वर कि मग काही बघायलाच नको. मला नेहमी म्हणायचीस,"मी खूप छान जगले.आता मला काsssही नको".तुझ्या मनासारखं आयुष्य जगता आलं खूप समाधान होता याचा तुला!
..आणि तसंच मनासारखं मरणही मिळवलंस तू.. हॉस्पिटल मध्ये भरती व्हायची वेळसुध्दा आणू दिली नाहीस. राहत्या घरीच बाबा शेजारी असताना शेवटचा श्वास घेतलास.. आणि ठेवून गेलीस न संपण्याऱ्या आठवणींची डोंगर!!

सुरवात मी तुझ्या जन्मदिवसाची आठवण म्हणून केली होती आणि शेवट तुझ्या स्मृतीने करतेय. तुला मी नेहमी सांगायचेच पुन्हा सांगते-
आज्जी तू खरंच awesome होतीस ग.. माझी S'hero' !!!
तुझी लाडकी -धनी

No comments:
Post a Comment